Fri, Sep 18, 2020 12:53होमपेज › National › पीएम 'स्वनिधी' योजनेच्या लाभासाठी ५ लाखाहून अधिक फेरीवाल्यांचे अर्ज

पीएम 'स्वनिधी' योजनेच्या लाभासाठी ५ लाखाहून अधिक फेरीवाल्यांचे अर्ज

Last Updated: Aug 12 2020 8:42PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोना विषाणूचा सामूहिक फैलाव रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय डबघाईला आले आहेत. हातावर पोट असलेल्या फेरीवाल्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे. अशात लॉकडाऊनंतर त्यांचे व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी माफक दरात खेळते भांडवल उपलब्ध करवून देण्यासाठी 'पंतप्रधान फेरीवाले विक्रेता आत्मनिर्भर निधी' (पीएम-स्वनिधि) योजना सुरु करण्यात आली आहे. योजने अंतर्गत २ जुलैपासून कर्ज प्रक्रिया सुरु झाल्यानंतर ४१ दिवसांच्या आत योजने अंतर्गत मंजूर कर्जाची संख्या १ लाख, तर कर्जासाठी करण्यात आलेल्या अर्जांची संख्या ५ लाखांच्यावर पोहोचली आहे. 

आणखी वाचा : मुंबई : बिलात दोष आढळणाऱ्या १० रूग्णालयांना महापालिकेने बजावल्या नोटीसा

खेळत्या भांडवलाच्या शोधात असलेल्या फेरीवाले विक्रेत्यांमध्ये पीएम-स्वनिधी योजनेमुळे बळ मिळाले असल्याचा विश्वास गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मंत्रालयाकडून ‘आत्मनिर्भर भारत अभियान’च्या कक्षेतही योजना सुरू करण्यात आली आहे. 

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर आसपासच्या निम-शहरी, ग्रामीण भागासह शहरी भागातील सुमारे ५० लाख फेरीवाले विक्रेत्यांना व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी एक वर्षासाठी १०,००० रुपयांपर्यंत खेळते भांडवल कर्ज सुलभपणे पुरवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. कर्जाच्या नियमित परत फेडीवर वार्षिक ७ टक्के  व्याज अनुदानाच्या रूपात प्रोत्साहन, तर विहित डिजिटल व्यवहार केल्याबद्दल वार्षिक १,२०० रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि वाढीव कर्जाच्या पुढील टप्प्यासाठी पात्रता देखील प्रदान केली जाते.

आणखी वाचा : वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ

वाणिज्य बँका-सरकारी आणि खासगी, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका, एसएचजी बँका इ. व्यतिरिक्त कर्ज पुरवठादार संस्था म्हणून बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि सूक्ष्म वित्तीय संस्था (एमएफआय) यांना सहभागी करून या 'नॅनो-उद्योजक' च्या दारी बँका आणण्याची कल्पना पीएम स्वनिधी योजनेत मांडण्यात आली आहे. डिजिटल पेमेंट मंचावर विक्रेत्यांचा सहभाग हा विक्रेत्यांना औपचारिक शहरी अर्थव्यवस्थेचा भाग बनण्यासाठी मदत करण्यासाठी त्यांचे क्रेडिट प्रोफाइल तयार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. लघु उद्योग विकास बँक (एसआयडीबीआय) ही या योजनेची अंमलबजावणी करणारा भागीदार आहे. 

आणखी वाचा : राजसेवा पूर्व परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल

फेरीवाले विक्रेत्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी सूक्ष्म आणि लघु उद्योग कर्ज हमी निधी ट्रस्ट (सीजीटीएमएसई) च्या माध्यमातून या कर्ज पुरवठादार संस्थांना पोर्टफोलिओ आधारावर, दर्जात्मक हमी सुरक्षा पुरवली जाते. फेरीवाले विक्रेते साधारणपणे त्यांचा व्यवसाय अत्यंत किरकोळ नफा ठेवून करतात. या योजनेंतर्गत सूक्ष्म पत पुरवठा सहाय्यामुळे अशा विक्रेत्यांना केवळ मोठा दिलासा मिळणार नाही तर आर्थिक उन्नती साधण्यात मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

आणखी वाचा : सांगली : तब्बल ५५ कोरोना रुग्णांच्या बिलात घोळ

 "