Mon, Jun 01, 2020 22:30
    ब्रेकिंग    होमपेज › National › एक जूनपासून ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ योजना लागू

एक जूनपासून ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ योजना लागू

Last Updated: Dec 03 2019 8:02PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

आगामी वर्षात १ जूनपासून ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील महत्त्वाकांक्षी योजना लागू होणार आहे. कुठेही काढलेल्या रेशन कार्डवर देशभरात कुठेही स्वस्त धान्य उपलब्ध होऊ शकणार आहे.

याआधी ज्या प्रभागातून अथवा पंचायतीतून रेशन कार्ड काढलेले आहे, त्या भागातील रेशन दुकानातूनच स्वस्त धान्याची खरेदी करता येत होती. यासंदर्भात मंगळवारी लोकसभेत प्रश्‍न काळामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ही माहिती दिली.

सध्या आंध्र प्रदेश, हरियाणासह काही राज्यांमध्ये १०० टक्के रेशन दुकानांवरून पीओएस यंत्रणा उपलब्ध झालेली आहे. ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ योजना लागू करण्यासाठी सर्वच दुकानांवर पीओएस यंत्रणा बसवावी लागेल.

सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीच्या एकात्मिक व्यवस्थापनांतर्गत (आयएमपीडीएस, इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ पीडीएस) काही राज्यांतून कुठल्याही जिल्ह्यात रेशन खरेदी सध्याच शक्य झालेली आहे. आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा आणि त्रिपुराचा यात समावेश आहे.