होमपेज › National › ‘सरकारकडे निधी भरपूर, पण सरकारी प्रशासनात नकारात्मक दृष्टीकोन’

‘सरकारकडे निधी भरपूर, पण सरकारी प्रशासनात नकारात्मक दृष्टीकोन’

Last Updated: Jan 20 2020 6:59PM
नागपूर : विशेष प्रतिनिधी 

भारतात लोकोपयोगी विकासकामांसाठी भरपुर योजना आहेत आणि या योजना राबवण्यासाठी निधीची मुळीच कमतरता नाही. मात्र, अशा सकारात्मक परिस्थितीतही सरकारी प्रशासनामध्ये निर्णय घेण्याचीच हिंमत नाही', असे खडे बोल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना लक्ष करत नागपुरात सुनावले. 

अधिक वाचा : 'विद्यार्थ्यांवर पालक व शिक्षकांनी दबाव टाकू नये'

नागपुरातील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (व्हीएनआयटी) हीरक महोत्सवाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते  झाले. यावेळी ते बोलत होते. गडकरी यांनी अतिशय परखड शब्दात प्रशासनातील सरकारी अधिका-यावर निशाणा साधला. प्रशासनातील नकारात्मक दृष्टीकोन बदलला पाहिजे, असेही ते यीवेळी म्हणाले. 

विविध योजनांवर काम न होण्याची कारणे सरकारमधील प्रशासनिक मानसिकता आणि नकारात्मक दृष्टीकोन असल्याचे परखड मत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त्त केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सरकारी प्रशासनातील कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

अधिक वाचा : पालकांनी, शिक्षकांनी मुलांच्या क्षमता ओळखायला हव्यात : पंतप्रधान

गडकरी म्हणाले, मागील ५ वर्षांच्या कालावधीत मी १७ लाख कोटी रुपयांची कामे केली आहेत. या वर्षी पाच लाख कोटी रुपयांची कामे करण्याचे उद्दीष्ट आहे. निधीची काहीही कमी नाही आणि हे सत्य आहे. जर कोणती कमतरता असेल, तर ती काम करण्याच्या मानसिकतेचीच आहे, नकारात्मक दृष्टीकोनाची आहे. 

ते पुढे म्हणाले की, विदर्भात वनोपज, कोळसा यासारख्या साधन संपत्तीचा मुबलक प्रमाणात साठा आहे. या कच्च्या मालावर संशोधन करण्यासाठी  नागपूरातील व्हिएनआयटी तसेच एल. आय. टी. (लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्था) यासारख्या संशोधन संस्थांचे सहाय्य आवश्यक असल्याचेही मत गडकरी यांनी व्यक्त केले.

 

अधिक वाचा : 'चांद्रयान २' सॉफ्ट लँडिंगचा पीएम नरेंद्र मोदींकडून उल्लेख