Fri, Sep 18, 2020 19:59होमपेज › National › काश्मीरवर बोलणं मलेशियाला पडले महाग!

काश्मीरवर बोलणं मलेशियाला पडले महाग!

Last Updated: Jan 19 2020 3:05PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

जम्‍मू-काश्मीर मुद्यावरून मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्‍मद यांनी घेतलेल्‍या भूमिकेमुळे भारताने पाम तेलाच्या आयातीमध्ये कपात केली. या नंतर दोन्ही देशांमध्ये गेल्‍या काही महिन्यांपासून असलेली तणावाची परिस्‍थिती निवळण्यासाठी कुटनितिक मार्गाने प्रयत्‍न केले जात आहेत. मात्र भारताच्या भुमिकेमुळे मलेशियाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

अधिक वाचा : शिर्डीत बेमुदत बंद; साई भक्तांची गैरसोय

पामतेल उत्‍पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्‍या मलेशियाला शुक्रवारी उत्‍पादनात मोठा झटका बसल्‍याचे दिसून आले. पाम तेलाच्या बेंचमार्क किंमतींमध्ये शुक्रवारी गेल्‍या ११ वर्षात सर्वात जास्‍त पडझड झाल्‍याचे दिसून आले. यानंतर मलेशियाचा सुर मऊ झाला आहे. त्‍यामुळेच मलेशियाने भारतासोबत चर्चा करण्याची इच्छाकाश्मीरवर बोलून मलेशियाला पडले महाग! 
व्यक्‍त केली आहे. 

अधिक वाचा : हार्दिक पटेलच्‍या अटकेप्रकरणी  प्रियांका गांधींनी भाजपवर साधला निशाणा

पुढच्या आठवड्यात दावोसमध्ये होणाऱ्या वर्ल्ड इकनॉमिक फोरमच्या बैठकीमध्ये मलेशियाचे वाणिज्‍य मंत्री डारेल लेइकिंग भारतचे वाणिज्‍य मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा करणार आहेत. या बैठकीचा कोणताही अजेंडा ठरवण्यात आलेला नाही. मात्र भारत आणि मलेशिया या दोन देशांमधील संबंधांच्या सुधारणेसाठी ही बैठक महत्‍वपूर्ण मानण्यात येत आहे. 

अधिक वाचा : देशद्रोहाच्या प्रकरणात हार्दिक पटेलला अटक

मलेशियाला भारतासोबत पाम तेलावरून सुरू झालेला तणाव कमी करायचा आहे. त्‍यासाठी मलेशिया कुटनितिक मार्गाने भारताशी चर्चेच्या मार्गाने यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्‍नशिल आहे. त्‍यामुळेच भारताचे वाणिज्‍य मंत्री पियुष गोयल यांनीही मलेशिया विरूध्द भारताकडून अजुन कोणतीही कारवाई केलेली नसल्‍याचे म्‍हटले होते. 

 "