Thu, Aug 13, 2020 17:07होमपेज › National › नेपाळमध्ये भूस्खलनामुळे ६० जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये भूस्खलनामुळे ६० जणांचा मृत्यू

Last Updated: Jul 13 2020 1:23PM
काठमांडू : पुढारी ऑनलाईन 

नेपाळमध्ये विविध ठिकाणी झालेल्या पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला आहे तर ४१ जण बेपत्ता आहेत. मुसळधार पावसामुळे मागील ४ दिवसांत येथे पूर आणि अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. पश्चिम नेपाळमधील म्याग्डी जिल्ह्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या शोधमोहिम आणि बचावकार्य सुरू आहे. 

मागील ३ दिवसांत नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे सातत्याने पूर आणि भूस्खलन होत आहे. एकूण १९ जिल्ह्यांमध्ये ही स्थिती आहे.