Fri, Nov 27, 2020 10:55होमपेज › National › खासगी रुग्णालयांकडून आरोग्यावर नगण्य खर्च

खासगी रुग्णालयांकडून आरोग्यावर नगण्य खर्च

Last Updated: Nov 21 2020 9:16PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशातील खासगी रुग्णालयांकडून आरोग्य क्षेत्रावर अगदी नगण्य खर्च केला जात आहे. कोरोना संकट काळातही खासगी रुग्णालयांनी लोकांकडून पैसे उकळल्याचा ठपका कोरोनासंदर्भात स्थापन केलेल्या संसदीय समितीने ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संसदीय समितीचा हा अहवाल आला आहे. सरकारी रुग्णालयांत बेडची संख्या कमी आहे, तर खासगी रुग्णालयांना रुग्णांकडून घ्यावयाच्या फीबाबत सरकारने दिशानिर्देश दिले नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. दर स्थिर ठेवले असते तर अनेक रुग्णांचा जीव वाचला असता, असेही या अहवालात म्हटले आहे. ‘आऊटब्रेक ऑफ पांडेमिक कोव्हिड 19 अँड इट्स मॅनेजमेंट’ हा अहवाल संसदीय समितीचे अध्यक्ष रामगोपाल यादव यांनी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांच्याकडे सुपूर्द केला. कोरोनावरील संसदीय समितीचा हा पहिलाच अहवाल आहे. भारतात आरोग्य क्षेत्रावर होणारा खर्च तसेच खासगी रुग्णालयांकडून होणार्‍या खर्चाचे प्रमाण नगण्य आहे.