Mon, Aug 10, 2020 05:08होमपेज › National › मोठा निर्णय! कोरोनाबाधितांना पोस्टल बॅलेटद्वारे करता येणार मतदान

मोठा निर्णय! कोरोनाबाधितांना पोस्टल बॅलेटद्वारे करता येणार मतदान

Last Updated: Jul 02 2020 9:26PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

देशभरात पसरलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ६५ वर्षापेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक आणि कोरोनाबाधितांना आगामी काळात पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. निवडणूक नियम १९६१ मध्ये या अनुषंगाने सुधारणा करण्यात आली आहे. 

आणखी वाचा : दिल्ली-मुंबई दरम्यान ताशी १६० किमी वेगाने धावणार ट्रेन

ज्या लोकांमध्ये कोरोनाची कमी लक्षणे आहेत तसेच ते होम क्वारंटाईनमध्ये आहेत, त्यांनाही पोस्टाद्वारे मतदान करण्याची सवलत मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे अशा नागरिकांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. चालू वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक नियमात बदल केला जाणार आहे.

आणखी वाचा : रशियाकडून २१ 'मिग-२९' विमान खरेदीला मंजुरी