Fri, Sep 25, 2020 16:05होमपेज › National › #BharatBachaoRally 'मरेन पण माफी मागणार नाही, माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे'

#BharatBachaoRally 'मरेन पण माफी मागणार नाही, माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे'

Last Updated: Dec 14 2019 2:17PM
नवी दिल्ली :  पुढारी ऑनलाईन

काँग्रेसने राजधानी दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर भारत बचाओ रॅली आयोजित केली आहे. या रॅलीमध्ये काँग्रेस नेत्यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घणाघाती हल्ला चढवला.
देश वाचवण्याची वेळ आली आहे अशा शब्दात अनेक नेत्यांनी प्रहार केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अत्यंत आक्रमकपणे हल्ला चढवला.

ते म्हणाले, भाजप माझ्या भाषणावरून माफी मागावी अशी मागणी करत आहे, पण मी माफी मागणार नाही. त्यांनी यावेळी सध्या भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी भाजपमधून जोर धरत आहेत त्या सावरकरांचा उल्लेख केला.  त्यांनी मी मरून जाईन, पण माफी मागणार नाही. माझे नाव राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहे. शुक्रवारी वाढत्या बलात्कारांच्या घटनांवर राहुल गांधी यांनी संसदेत रेप इन इंडियाचा उल्लेख केला होता. त्यानंतर भाजप महिला खासदारांनी त्यांच्याविरोधात मोर्चा खोलताना माफीची मागणी लावून धरली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने दाद मागण्यात आली. या पार्श्वभूमीवर राहुल यांनी वरील प्रत्युत्तर दिले. 

त्यांनी मोदी-शहा या जोडगोळीवर कडाडून प्रहार करताना त्यांनीच माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली. त्यांनी अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त केली. देशातील अर्थव्यवस्था संपुष्टात आली आहे. त्यांनी स्विस बँकेतून पैसे आणायचे आहेत, ब्लॅक मनीच्या विरोधात लढायचं आहे असे खोटं सांगितलं. वास्तवात त्यांनी गरीबांच्या खिशातील पैसे अदानी आणि अंबानी यांना देऊन टाकले अशा शब्दात त्यांनी हल्ला चढवला. 

 "