Wed, May 12, 2021 01:35
क्राईम : पत्नीची छेड काढणाऱ्या मोठ्या भावाची दृश्यम स्टाईलने हत्या; पत्नीच्या व आईच्या मदतीने घरामागेच पुरला होता मृतदेह

Last Updated: Apr 23 2021 1:11PM

कोल्लम ः पुढारी ऑनलाईन 

बऱ्याच वर्षांनी मोठा भाऊ घरी आला. त्याने छोट्या भावाच्या पत्नीची छेड काढली. त्याचा राग मनात घेत लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केली. इतकंच नाही, त्याचा मृतदेह पत्नीच्या आणि आईच्या मदतीने स्वतःच्या घराच्या मागेच पुरला. ही हत्या होऊन दीड वर्षांनंतर मृत्यू छडा लागला. ही घटना केरळ राज्यातील कोल्लम गावात घडली. दृश्यम चित्रपटाच्या प्रभावातून घेत हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. 

वाचा ः अमरावती क्राईम : २० वर्षीय तरुणाची हत्या

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव शाजी पीटर आहे. तो व्यक्ती बरीच वर्षे आपल्या घरापासून दूर राहिला होता. २०१८ मध्ये आपल्या घरी तो परतला होता. असं सांगितलं जातं की, शाजीने आपल्या छोट्या भावाच्या म्हणजेच साजीन पीटर पत्नीचा विनयभंग केला होता. त्यानंतर साजीनने आपल्या भावाची हत्या केली. हत्येनंतर साजीनने आईच्या आणि पत्नीच्या मदतीने शाजीच्या मृतदेहाला घराच्या पाठिमागील आवारात पुरून टाकले. ही सर्व घटना 'दृश्यम' चित्रपटातून प्रेरित झाली आहे, असं सांगितलं जात आहे. 

वाचा ः माहेरी आलेल्या बहिणीची सख्या भावाकडून हत्या

इतर नातेवाईकांकडून साजीन आणि त्याच्या कुटुंबाला शाजीच्या बाबतीत विचारणा केली जात होती. तेव्हा हे शाजी केरलच्या मल्लापुरममध्ये कामासाठी गेला आहे, असेच उत्तर देत होते. हा प्रकार सुमारे दीड वर्षे सुरु होता. जेव्हा एका व्यक्तीच्या मदतीने या सर्व घटनेचा खुलासा झाला तेव्हा हा सर्व प्रकार पोलिसांच्या लक्षात आली आणि त्यांना साजीन पीटर, त्याची आई आणि पत्नी यांना ताब्यात घेतले. जेव्हा शाजी पीटरचा मृतदेह बाहेर काढला गेला, पोलिसांच्या लक्षात आले की, व्यवस्थित नियोजन करून, मृतदेहाचा दुर्गंध येऊ नये याची काळजी घेतली होती.