Fri, Dec 04, 2020 04:28होमपेज › National › राहुल गांधी यांच्यावर भाजपचा कडाडून हल्लाबोल

राहुल गांधी यांच्यावर भाजपचा कडाडून हल्लाबोल

Last Updated: Jul 04 2020 7:24PM

काँग्रेस नेते राहुल गांधी, अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वीनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेस पक्ष हा पप्पू का घोंसला आणि परिवार का चोंचला बनून राहिला असल्याची टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी शनिवारी केली. भारत आणि चीनदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. त्यानंतर आता काँग्रेस आणि भाजपमध्ये हमरीतुमरी होताना दिसत आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना यांच्यावर टीका नक्वी यांनी काँग्रेस पक्षाचेही वाभाडे काढले आहेत.

'इंदिरा गांधी लेहला गेल्या तेव्हा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते, बघुया मोदी काय करतात'

लडाखची जनता चीनच्या घुसखोरीविरोधात आवाज उठवत आहे. त्यांच्याकडे जर सरकारने दुर्लक्ष केले तर ते महागात पडू शकते, असा इशारा राहुल गांधी यांनी नुकताच केंद्र सरकारला दिला होता. गांधी यांच्या या वक्तव्याचा मुख्तार अब्बास नक्वी यांनी समाचार घेतला. ‘काँग्रेस पक्ष हा पप्पू का घोंसला आणि परिवार का चोंचला’ बनून राहीला असल्याची टीकाही नक्वी यांनी केली.

प्रियांका गांधी दिल्लीला बाय बाय करुन 'या' शहरात जाणार?

तसेच जेव्हा सैन्यदलाकडून शत्रूला सडेतोड उत्तर दिले जात असते, त्यावेळीच तुम्ही शत्रूला ऑक्सिजन पुरवण्याचे काम करत असता. यामुळेच काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस कमजोर होत चालला आहे, असेही नक्वी म्हणाले.