Wed, May 27, 2020 03:21होमपेज › National › तामिळनाडूत भीषण अपघात, २० जणांचा मृत्यू 

तामिळनाडूत भीषण अपघात, २० जणांचा मृत्यू 

Last Updated: Feb 20 2020 9:52AM
तिरुपूर : पुढारी ऑनलाईन 

तामि‍ळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यात केरळ राज्य परिवहनची बस आणि लॉरीच्या धडकेत २० जणांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी अविनाशी कस्बा येथे घडली. मृतदेह तिरुपूर जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले आहे. बस बंगळूर ते तिरुवनंतपूरमकडे जात होती. अविनाशीचे डेप्युटी तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्यांमध्ये १४ पुरुष आणि ६ महिलांचा समावेश आहे. 

केरळचे परिवहन मंत्री एके ससींद्रन यांनी सांगितले की, 'केरळ राज्याचे रस्ते परिवहन निगम (केएसआरटीसी) चे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघातात २० जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. केएसआरटीसीचे मॅनेजिंग डायरेक्टर चौकशी करतील आणि अहवाल सादर करतील.' 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस बंगळूर ते तिरुवनंतपूरमकडे जात होती. कंटेनर लॉरी कोईमतूर-सेलम राजमार्गावर विरूध्द दिशेने येत होती, तेव्हा दोन्ही गाड्यांची समोरासमोर टक्कर झाली. ही दुर्घटना पहाटे साडे चार वाजता झाली. बसमध्ये ४८ प्रवासी होते. यापैकी १९ लोकांचा जागीच मृत्यू झाला.