Wed, Dec 02, 2020 09:03होमपेज › National › पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, नागरिकाचा मृत्यू

पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, नागरिकाचा मृत्यू

Last Updated: Jul 08 2020 9:42AM
श्रीनगर : पुढारी ऑनलाईन 

पाकिस्तानने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये पुंछ जिल्ह्यात बालाकोट आणि मेंढर सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्यांकडून गोळीबार झाल्यानंतर भारतीय जवानांनीदेखील सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तानकडून करण्यात झालेल्या गोळीबारात बालाकोटमध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला. तर एक व्यक्ती जखमी झाला.

जखमीला उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानी सैन्याने रात्री २ वाजण्याच्या सुमारास शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर दिले. जवळपास पावणे तीन वाजण्याच्या सुमारास उभय देशांकडून गोळीबार झाला.