Sun, Oct 25, 2020 07:37होमपेज › National › मानवी तस्करी करणाऱ्या दोघांना तेलंगणात अटक, मुंबईच्या २ मुलींची सुटका

मानवी तस्करी करणाऱ्या दोघांना तेलंगणात अटक, मुंबईच्या २ मुलींची सुटका

Last Updated: Jul 08 2020 5:09PM
हैदराबाद : पुढारी ऑनलाईन

तेलंगाणात मलकाजगिरीच्या जवाहरनगरमध्ये छापा टाकून पोलिसांनी मानवी तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केलीय. हे तस्कर आंतरराज्य तस्करी करणाऱ्या टोळीचे सदस्य आहेत. त्यापैकी एक कर्नाटकातील तर दुसरा बिहारमधील आहे. या छाप्यामध्ये २ ग्राहकांनाही पोलिसांनी अटक केली. तर मुंबईतील दोन महिलांची सुटका करण्यात आली.

अधिक वाचा : बीएसएनएल,एमटीएनएलच्या मालमत्ता विक्री प्रक्रियेला वेग, ३७ हजार कोटींची संपत्ती विकणार

तेलंगाणातील मलकाजगिरीच्या जवाहरनगरमध्ये स्वतंत्र बंगल्यात अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या बंगल्यावर छापा टाकला. त्यावेळी चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या प्रकरणी बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील रजनीश रंजन वय २४ आणि कर्नाटकातील बीदरच्या सुकेश कांबळे वय ३२ या आरोपींना पोलिसांनी अटक केली. तसेच पी. साईकिरण वय ३२ आणि मोहम्मद सिराज वय २७ या तेलंगणातील दोन ग्राहकांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तर मुळचा बिहारमधील छपराचा राहणारा मिथिलेश शर्मा हा फरार झाला. यावेळी दोन मुलींची सुटका करण्यात आली. त्या दोघीही मुंबईतील आहेत. 

अधिक वाचा : कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानकडून नवी खेळी?

पोलिसांना संबंधित घर ताब्यात घेऊन सील केले आहे. तसेच घटनास्थळावरुन ५ मोबाईल फोन, ४ दुचाकी गाड्यांसह इतर साहित्यही ताब्यात घेतले. अनोळखी लोकांना घर दिल्याबद्दल घरमालकाला समज देण्यात आली आहे. रचकोंडाचे पोलिस आयुक्त महेश भागवत यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आली. घर भाड्याने देताना लोक कशा पद्धतीचे आहेत, काय काम करतात याची खात्री करुन घर भाड्याने देण्याचे आवाहन यानिमित्ताने पोलिसांनी केले आहे.

अधिक वाचा : विद्यापीठ, महाविद्यालयांतील शैक्षणिक सत्र नोव्हेंबरपासून!

अधिक वाचा : राजीव गांधी फाउंडेशनच्या फंडिंगची केंद्र सरकारकडून चौकशी 

अधिक वाचा : गलवान खोऱ्यातून २ किमी मागे हटलं चिनी सैन्य!

 "