Thu, Sep 24, 2020 17:28होमपेज › National › चिंताजनक! कोरोनामुळे एका दिवसात ५१९ जणांचा बळी

चिंताजनक! कोरोनामुळे एका दिवसात ५१९ जणांचा बळी

Last Updated: Jul 11 2020 10:55AM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

देशाच्या चिंतेत दिवसागणिक अधिकच भर पडत चालली आहे. गेल्या २४ तासांत २७ हजारांहून अधिक कोरोना बाधितांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे देशातील बाधितांच्या आकड्याने ८ लाखांचा टप्पा पार केला आहे. तर मृतांच्या आकड्यातही झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. 

देशात बाधितांच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात गुणाकार होत चालला असून काल दिवसभरात २७ हजार १४४ नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर ५१९ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत मृतांच्या संख्येने उच्चांकी गाठली आहे. 

दिवसागणिक वाढत्या बाधितांच्या संख्येमुळे देशातील आकडा ८ लाख २० हजार ९१६ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत ५ लाख १५ हजार ३८६ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या २ लाख ८३ हजार ४०७ जणांवर उपचार सुरू असून आतापर्यंत कोरोनामुळे २२ हजार १२३ जणांचा बळी गेला आहे. 

देशासह महाराष्ट्रातदेखील कोरोनाचा कहर सुरूच आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात राज्यात ७ हजार ८६१ नव्या रूग्णांची नोंद झाली असून बाधितांचा आकडा २ लाख ३८ हजार ४६१ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत १ लाख ३२ हजार ६२५ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात ९५ हजार ६४७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

 "