Tue, Aug 04, 2020 13:47होमपेज › National › भारताच्या वाघांवरील सर्वेक्षणाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद!

भारताच्या वाघांवरील सर्वेक्षणाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद!

Last Updated: Jul 11 2020 4:50PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारतात वाघांवर केलेल्या २०१८ मधील सर्वेक्षणाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. द ऑल इंडिया टायगर इस्टीमेशन तर्फे १ लाख २१ हजार ३३७ चौ. किमीमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते. ते जगातील सर्वात मोठे सर्वेक्षण ठरले आहे. या सर्वेक्षणादरम्यान २६ हजार ७६० ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशनवर कॅमरे लावण्यात आले होते. या मोहिमेदरम्यान वन्य प्राण्यांचे तब्बल ३.५ कोटी फोटो घेण्यात आले. त्यापैकी ७६ हजार ६५१ फोटो वाघांचे आणि और ५१ हजार ७७७ फोटो बिबट्यांचे आहेत.

आणखी वाचा : महाराष्ट्रात संघर्ष सुरु असतानाच केजरीवाल सरकारने घेतला मोठा निर्णय!

सर्वेक्षण २०१८ चे, विक्रमाची घोषणा झाली आता...

वाघांवरील सर्वेक्षण हे २०१८ मध्ये झाले होते. जे मागील वर्षी प्रसिद्ध झाले होते. तर जागतिक विक्रमाची घोषणा आता करन्यात आली आहे. या सर्वेक्षणानुसार देशातील वाघांच्या बछड्यांच्या संख्येला सोडून वाघांची संख्या २ हजार ४६१ आहे. तर एकूण संख्या २ हजार ९६७ आहे. २००६ मध्ये ही संख्या १४११ होती. तेव्हा भारताने ही संख्या २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले होते. भारतात सर्वाधिक १ हजार ४९२ वाघ हे तीन राज्यांमध्ये आहेत. यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. 

आणखी वाचा : कोरोना नष्ट होणे अशक्य; WHO ने दिली धोक्याची सूचना

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, वन्यजीव सर्वेक्षण आणि स्वावलंबी भारताचे हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने २०२२ पूर्वीच चार वर्षेआधी वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. जगातील एकूण वाघांच्या संख्येपैकी ७० टक्के वाघ हे एकट्या भारतात आहेत.

आणखी वाचा : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा होम क्‍वारंटाईन