Sat, Apr 10, 2021 20:46
कोरोनाचा विस्‍फोट : देशात सव्‍वा लाखांहून अधिक रुग्‍णांची नोंद, ६८५ जणांचा मृत्‍यू

Last Updated: Apr 08 2021 10:22AM

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

देशभरात कोरोना रुग्‍णवाढीचा विस्‍फोट सुरुच राहिला आहे. मागील २४ तासांमध्‍ये तब्बल १ लाख, २६ हजार, ७८९ नवे रुग्‍ण आढळले.  ६८५ रूग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, ५९ हजार २५८ रूग्णांनी कोरोनावर मात केली, अशी माहिती आरोग्‍य मंत्रालयाने आज दिली. 

वाचा : कोव्हिडमुळे भारतातील टी-२० वर्ल्डकप धोक्यात?

देशात सलग दोन दिवस २४ तासांमध्‍ये एक लाखांहून अधिक रुग्‍ण आढळले आहेत. यापूर्वी सोमवारी (दि.५) एक लाखांहून अधिक रुग्‍ण आढळले होते. यानंतर त्‍यापूर्वी १७ सप्‍टेंबर २०२० रोजी २४ तासांमध्‍ये ९७ हजार ८९५ नवे रुग्‍ण आढळले आहे.  मागील वेळेस एक लाख रुग्‍ण आढळण्‍यास ११० दिवसांचा कालावधी लागला होता. मात्र आता सलग दोन दिवस रुग्‍णसंख्‍येचा आकडा एक लाखांच्‍या वर गेल्‍याने चिंतेत भर पडली आहे. 

वाचा : 'कोरोना'नंतर कोरडा खोकला कशामुळे होतो?

देशात आतापर्यंत १ कोटी २९ लाख, २८ हजार ५७४ जणांना कोरोनची लागण झाली आहे. यामध्‍ये १ कोटी, १८ लाख, ५१ हजार ३९३ रुग्‍ण बरे झाले आहेत. सध्‍या देशात ९ लाख १० हजार ३१९ रुग्‍णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ६६ हजार ८६२ जणांचा मृत्‍यू झाला आहे. ९ कोटी, १ लाख, ९८ हजार ६७३ जणांचे लसीकरण करण्‍यात आले आहे.