Thu, Jan 21, 2021 16:05
पेट्रोल, डिझेल दरात पुन्हा वाढ, मुंबईत पेट्रोल ९१ रुपयांच्या वर⛽

Last Updated: Jan 13 2021 2:37PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर भडकल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. पाच दिवस दर स्थिर ठेवल्यानंतर तेल कंपन्यांनी ही दरवाढ केली. (India petrol prices hit record high retailing at Rs 84.45 per litre in NCR) आहे. ताज्या दरवाढीनंतर मुंबईमध्ये पेट्रोलचे प्रति लिटरचे ९१ रुपयांच्या वर गेले आहेत. 

वाचा: मुडेंशी नाव जोडल्या गेलेल्या करूणा शर्मा सामाजिक कार्यात आघाडीवर...

जगातील अनेक देशात कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. तर भारतासह अनेक देशात लसीकरण मोहिमेला लवकरच प्रारंभ होईल. जागतिक अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने इंधनाची मागणी वाढली आहे. त्यातच सौदी अरेबियासह ओपेक संघटनेने क्रूड तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जागतिक बाजारात क्रूड तेलाचे दर भडकले आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत ५२ डॉलर्स प्रति बॅरलवरअसलेले क्रूड तेलाचे दर आता ५७ डॉलर्सच्या समीप गेले आहेत. 

वाचा:धनंजय मुंडे यांना द्विभार्या प्रतिबंधक कायदा का लागू होत नाही?

क्रूड तेलाच्या दरवाढीचा आधार देत तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल-डिझेल दरात वाढ केली. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे लिटरचे दर ८४.४५ रुपयांवर गेले असून डिझेलचे दर ७३.६३ रुपयांवर गेले आहेत. मुंबईमध्ये हेच दर क्रमशः ९१.७ व ८१.३४ रुपयांवर गेले आहेत. चेन्नई आणि कोलकाता येथे पेट्रोलचे दर क्रमशः ८७.१८ आणि ८५.९२ रुपयांवर गेले असून डिझेलचे दर ७९.९५ व ७८.२२रुपयांवर गेले आहेत.