Tue, Jul 14, 2020 11:45होमपेज › National › भारत-चीन सीमावाद : कमांडर स्तरावरील आज तिसरी बैठक

भारत-चीन सीमावाद : कमांडर स्तरावरील आज तिसरी बैठक

Last Updated: Jun 30 2020 9:34AM
लडाखमधील चुशुल येथे आज होणार बैठक

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन  

लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यांत झालेल्या हिंसक झटापटीनंतर दोन्ही देशांत तणाव वाढला आहे. दोन्ही देशातील तणाव कमी होण्यासाठी चर्चा सुरू आहे. या मुद्द्यावर आज दि. ३० रोजी कोर कमांडर स्तरावर तिसरी बैठक होणार आहे. ही बैठक लडाख येथील चुशूलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. मागील २ बैठका मोल्डो येथे झाल्या होत्या.

गलवान खोऱ्यात भारतीय जवान आणि चिनी सैन्यामध्ये हिंसक झटापट झाली होती. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. 

दरम्यान, भारतीय हद्दीत घुसखोरी झाली नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत म्हटले होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यास सडेतोड उत्तर दिले जाईल. असा इशाराही मोदी यांनी यावेळी दिला होता.