Sat, Oct 31, 2020 15:21होमपेज › National › #corona : देशात २४ तासांत ८६ हजार नवे रुग्ण

#corona : देशात २४ तासांत ८६ हजार नवे रुग्ण

Last Updated: Sep 21 2020 10:22AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

देशात मागील २४ तासांत ८६ हजार ९६१ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत १ हजार १३० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतची कोरोना रुग्णांची संख्या ५४ लाख ८७ हजार ५८१ झाली आहे. यामध्ये १० लाख ३ हजार २९९ सक्रीय रुग्ण आहेत. ४३ लाख ९६ हजार ३९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ८७ हजार ८८२ झाली आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.  

२० सप्टेंबरपर्यंत एकूण ६ कोटी ४३ लाख ९२ हजार ५९४ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये काल ७ लाख ३१ हजार ५३४ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

 

 "