Fri, Oct 30, 2020 18:06होमपेज › National › कोरोनाचे २४ तासांत ८६ हजारांहून अधिक रुग्ण

कोरोनाचे २४ तासांत ८६ हजारांहून अधिक रुग्ण

Last Updated: Sep 24 2020 10:05AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

देशात कोरोनाचे थैमान अद्याप कायम आहे. गेल्या २४ तासांत ८६ हजार ५०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार १२९ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतची कोरोना रुग्णांची संख्या ५७ लाख ३२ हजार ५१९ इतकी झाली आहे. 

यामध्ये ९ लाख ६६ हजार ३८२ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ४६ लाख ७४ हजार ९८८ जण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ९१ हजार १४९ झाली आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. 

२३ सप्टेंबरपर्यंत कोरोनाचे ६ कोटी ७४ लाख ३६ हजार ३१ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे. 

 

 "