Tue, Aug 11, 2020 21:48होमपेज › National › पॉर्न पाहणारा भारत तिसरा मोठा देश 

पॉर्न पाहणारा भारत तिसरा मोठा देश 

Last Updated: Dec 08 2019 8:35PM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा इंटरनेटवर सहज उपलब्ध असलेल्या अश्‍लील साहित्यसामग्रीवर बंदी घालण्याची चर्चा देशात सुरू झाली आहे. टेलिकॉम उद्योगातील तज्ज्ञांच्या मते भारतात एकूण इंटरनेट वापरापैकी 70 टक्के वापर पोर्नोग्राफी बघण्यासाठी होतो. काही पॉर्न संकेतस्थळांनीही याला दुजोरा दिला आहे. पॉर्न हब या संकेतस्थळानुसार अमेरिका आणि ब्रिटननंतर पॉर्न पाहणारा भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. 

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अश्‍लीलतेचा प्रसार रोखण्यासाठी खासदारांच्या समितीकडून उपाय मागवून यावरील चर्चा पुढे नेली आहे.  अर्थात, हा मुद्दा चर्चेचा नक्‍कीच आहे. इंटरनेटवर सहज उपलब्ध असलेल्या पोर्नोग्राफिक सामग्रीमुळे तरुण विकृत मानसिकतेचे शिकार होत आहेत. त्यातून बलात्कारासारखे गुन्हे घडत आहेत. 

पॉर्न हब या संकेतस्थळाच्या माहितीनुसार भारतात 2013 ते 2017 या काळात पॉर्न ट्रॅफिकमध्ये 121 टक्के वाढ झाली आहे. जगातील कुठल्याही देशापेक्षा ही आकडेवारी जास्त आहे. 2013 मध्ये 39 टक्के पॉर्नोग्राफिक सामग्री मोबाईल फोनद्वारे पसरत होती. तेच प्रमाण 2017 मध्ये 86 टक्के झाले आहे. टेलिकॉम सर्व्हिस कंपन्यांनी स्वस्त इंटरनेट डेटा देण्यास सुरुवात केल्यानंतर ही वाढ झाल्याचे समोर आले आहे. 

टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धेमुळे इंटरनेट खूप स्वस्त पैशात उपलब्ध झाले आहे. तेव्हापासून अश्‍लील सामग्री पाहणार्‍यांची संख्याही 75 टक्के वाढली आहे. शिवाय पॉर्न पाहण्याचा वेळही सरासरी 60 टक्के वाढला आहे.

स्वस्त दरात डाटा पुरवठा...

डिजिटलायझेशनसाठी टेलिकॉम कंपन्यांवर स्वस्तः इंटरनेट पुरवठा करण्याचा सरकारचा दबाव असतो. सरकार स्वतःहूनही अनेक ठिकाणी मोफत वायफाय, ब्रॉडबँड लावत असते. पाटणा रेल्वेस्थानकावर मोफत वायफायचा सर्वाधिक वापर अश्‍लील सामग्री पाहण्यासाठी झाल्याचे समोर आले आहे. 

स्मार्ट फोनवर जास्त वेळ खर्च

स्मार्ट फोन हा जीवनशैलीचा एक भाग बनल्याने माणसाचा वेळ स्मार्ट फोनसोबत जास्त जाऊ लागला आहे. आठवड्यातले सरासरी 28 तास लोक स्मार्ट फोनवर असतात, असे समोर आले आहे. हा आकडा टीव्ही पाहण्यापेक्षाही जास्त आहे. स्मार्ट फोनवर एकूण खर्च होणार्‍या वेळेपैकी 45 टक्के वेळ मनोरंजनासाठी असतो.