Thu, Apr 02, 2020 00:18होमपेज › National › भारतात येण्यापूर्वी ट्रम्प मोदी यांच्याविषयी काय म्हणाले? 

भारतात येण्यापूर्वी ट्रम्प मोदी यांच्याविषयी काय म्हणाले? 

Last Updated: Feb 19 2020 9:54AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

राष्ट्रपती ट्रम्प २४ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान भारत आणि अमेरिका या उभय पक्षांमध्ये व्यापारसंदर्भात करार होईल. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी म्हटले आहे की, मला पीएम मोदी आवडतात. आम्ही भारतासोबत ट्रेड डील करू शकतो, परंतु, भारतासोबत आम्ही नंतर करार करू. मला वाटतं की, ७ दशलक्ष लोक एअरपोर्ट आणि इव्हेंटमध्ये उपस्थित असतील. आणि जिथे कार्यक्रम होणार आहे तो स्टेडियम जगातील सर्वात मोठा स्टेडियम असेल आणि हे खूपच औत्सुक्याचे असेल. कॅलिफोर्नियाला रवाना होण्याआधी ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

वाचा -  पुलवामामध्ये एन्काऊंटर, 3 दहशतवाद्यांचा खात्मा

ट्रम्प म्हणाले, आता कराराविषयी सांगता येत नाही. मोठी ट्रेड डील अमेरिकेच्या निवडणुकीआधी होऊ शकणार नाही, परंतु, पुढे एखादा व्यापारसंदर्भातील करार होऊ शकतो. पंतप्रधान मोदी मला आवडतात.' 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्याविषयी उत्सुक दिसत आहेत. याआधी ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये आपल्या कार्यालयात पत्रकारांशी बातचीत करताना म्हटले होते की, ते भारत दौऱ्याची तयारी करत आहेत. जेथे लाखो लोक त्यांच्या स्वागतासाठी तयार आहेत.

दोन दिवसीय भारत दौरा 

व्हाईट हाऊसने १० फेब्रुवारीला घोषणा केली होती की, डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारी आणि २५ फेब्रुवारी भारत दौऱ्यावर येतील. ट्रम्प अहमदाबाद आणि नवी दिल्लीला भेट देणार आहेत. ट्रम्प म्हणाले होते, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे मित्र आहेत, ते चांगले व्यक्ती आहेत. मला  भारतात जाण्याची प्रतीक्षा आहे. आम्ही या महिन्याच्या अखेरीस भारतात जात आहोत.'