Wed, Apr 01, 2020 23:40होमपेज › National › हिमाचल प्रदेशातील जंगलाला भीषण आग

हिमाचल प्रदेशातील जंगलाला भीषण आग

Last Updated: Feb 19 2020 11:50AM
किन्नौर : पुढारी ऑनलाईन 

हिमाचल प्रदेशातील  किन्नौर जिल्ह्यात चौरा भागत असलेल्या जंगलाला आज (दि.19) सकाळी भीषण आग लागली. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. काही प्रमाणात आग आटोक्यात आणली आहे. दरम्यान, स्थानिनक नागरिकांनी गवत जाळल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. 

किनौर जिल्ह्यातील रामपूर वन विभागाचे वन सौरक्षक बी. एल. नेगी यांनी सांगितले की, 'हा मोठा वणवा नाही, गवताळ जंगलाला लागलेली आग आहे. आम्ही याबाबत माहिती घेत आहोत. याचबरोबर आगीवर लक्ष ठेवून आहोत. आमची एक टीम स्थानिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरुन ही आग जंगलात पसरु नये.'

Image
आग लागण्याच्या कारणाबाबत बोलताना बी. एल. नेगी म्हणाले, 'स्थानिक लोकांचा वाळलेले गवत जाळल्यानंतर नवे गवत वेगाने आणि चांगले येते असा चुकीचा समज आहे. आम्ही त्यांचे प्रबोधन करत आहोत. आतापर्यंत मोठ्या आगीचे वृत्त नाही.'

Image
गेल्या काही आठवड्यापासून किनौरच्या जंगलात आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी जगभरात अशा दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. पृथ्वीचे फुप्फुस म्हणून ओळखले जाणाऱ्या अॅमॅझोनच्या जंगलाचा बराच मोठा भाग आगीत भस्मसात झाला होता. त्यानंतर काही महिन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियातील जंगालालाही भीषण आग लागली होती. या दोन्ही आगी आटोक्यात आणण्यात तेथील प्रशासन फेल ठरले होते. त्यामुळे वन्य प्राण्यांचे आणि झाडांचे प्रचंड नुकसान झाले.