Thu, Jul 02, 2020 23:51होमपेज › National › गुजरातमध्ये 172 कोरोनाग्रस्त महिलांची प्रसुती, 44 नवजात कोरोनाग्रस्त

गुजरातमध्ये 172 कोरोनाग्रस्त महिलांची प्रसुती, 44 नवजात कोरोनाग्रस्त

Last Updated: May 31 2020 10:26AM
अहमदाबाद : पुढारी ऑनलाईन 

गुजरातमध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता अहमदाबादमधील जवळपास 172 गर्भवतींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ माजली. शहरातील सरकारी रुग्णालय, एसवीपी, सोला सिविल, शारदाबेन आणि एलजी रुग्णालयात जवळपास 172 कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिला होत्या. त्यांना प्रसुतीच्या आधी करण्यात आलेल्या चाचाणीत कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले होते. यातील बऱ्याच महिलांमध्ये कोणतेही लक्षण दिसत नव्हते. त्यानंतर या महिलांनी आपल्या बालकांना जन्म दिला. त्यातील जवळपास 44 नवजात बालकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

हाती देशाची दोरी अन् ती कोरोनासंहार करी

दरम्यान, सिविल हॉस्पिटलमधील स्त्रीरोग विभागाचे प्रमुख अमिय मेहता यांनी, 'प्रसुत झालेली प्रत्येक महिला एकच प्रश्न विचारत आहे की माझे बालक सुरक्षित राहणार का? आकडेवारीवरुन गेल्या 2 महिन्यात कोरोना बाधित महिलांनी  90 मुलांना जन्म झाला आहे. यापैकी 30 टक्क्यापेक्षा कमी मुलांना जन्मानंतर कोरोनाची लागण झाली आहे.   

याचबरोपर एसवीपी रुग्णालयात 70 कोरोनाग्रस्त महिलांची प्रसुती झाली. त्यामध्ये 15 किंवा 21.4 टक्के बालके कोरोना पॉझिटिव्ह निघाली. या रुग्णालयातील डॉक्टर पारूल शहा यांनी सांगितले की, महिला स्वाईन फ्लू सारख्या संक्रमित आजारापेक्षा कोरोनाचा आजाराचा सामना चांगल्या प्रकारे करत आहेत. या सर्व कोरोनाग्रस्त महिलांपैकी फक्त एकाच महिलेला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन लावावा लागला. बाकीच्या महिला स्वतःच रिकव्हर झाल्या. 

चीनमधून कंपन्या भारतात येण्याचा मार्ग मोकळा

सोला सिविल हॉस्पिटलमधील डॉक्टर अजय देसाई यांनी सांगितले की, त्यांच्या रुग्णालयात 12 गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. पण, त्यापैकी एकाच्याही नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली नाही. काही प्रकरणात जटिलता निर्माण झाली होती. कारण या परिस्थितीत प्रतिकार शक्तीवर परिणाम होतोच. कोरोनाग्रस्त महिलेला बरे करुन मग प्रसुती करण्याने काही वेळा सी सेक्शन प्रक्रियेमध्ये विलंब होतो. पण, इमर्जन्सी केसमध्ये आमच्याकडे कोणताही पर्याय राहत नाही. आम्ही सर्व प्रक्रिया काळजीपूर्वक करत होतो. 

आता मोबाईल क्रमांक होणार अकरा अंकी 

काही जाणकारांच्या मते प्रसुती महिलांचे साधारण वय हे 20 ते 30 दरम्यान असते, या महिलांमध्ये आजार आढळून आला नाही. काही मुलांचा अपवाद वगळता काही मुले कोरोनाची लागण होण्यापासून बचावले. डॉक्टर मेहता म्हणतात, 'आईपासून मुलाला कोरोनाची लागण होण्याला व्हर्टिकल ट्रान्समिशन म्हणून ओळखले जाते याबाबत अजून अभ्यास करण्याची गरज आहे. बालकांचे कोरोना पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह होणे, अँटिबॉडीज कधी तयार झाल्या, काही केसमध्ये असे घडले नाही तर ते का घडले नाही. या सर्व बाबींचा अभ्यास होणे गरजेचे आहे.