Wed, Jan 20, 2021 20:48
दिल्ली विमानतळावर जीनोम सिक्वेन्सिंगची सुविधा

Last Updated: Jan 14 2021 6:38PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

विदेशातून भारतात परतणाऱ्या  प्रवाशांच्या कोरोना तपासणीकरीत देशात पहिल्यांदाच दिल्ली विमानतळावर जीनोम सिक्वेन्सिंगची सुविधा सुरु करण्यात आली आहे. (Genome sequencing facility at Delhi Airport) गुरुवारपासून नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हि सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. जगातील अनेक देशात कोरोना संसर्गाचे वेगवेगळे स्वरूप आढळले आहेत. या नवीन स्वरूपाची ओळख पटवण्याकरीत रुग्णांची कोरोना तपासणीसह त्याच्या नमुन्यात नवीन स्टेनचा शोध घेण्याकरिता जीनोम सिक्वेन्सिंग देखील करावी लागते.

आता पर्यंत हि तपासणी देशातील उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रगोशाळेतच उपलब्ध होती. परंतु, पहिल्यांदा अशाप्रकारची सुविधा प्रयोगशाळेतून बाहेर विमानतळावर उपलब्ध करवून देण्यात आली आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची  विमानतळ परिसरातच तपासणी शिवाय जीनोम सिक्वेन्सिंग करता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. स्पाइस हेल्थ तर्फे ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवास करून मायदेशी परतणाऱ्या प्रवाश्यांची अगोदर आरटी-पीसीआर तपासणी केली जाईल. कोरोना संसर्ग आढळणाऱ्या प्रवाश्यांची जीनोम सिक्वेन्सिंग केली जाईल. कोरोना संसर्ग न आढळणाऱ्या प्रवाश्यांना देखील सक्तीच्या विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. नवी दिल्लीतील सीएसआयआरच्या आयजीआयबी संस्थेचे वैज्ञानिक या तंत्रज्ञानाला विमानतळावर विकसित करण्यासाठी मदत करणार असल्याची माहिती हि समोर आली आहे.