Mon, Jun 14, 2021 00:57



होमपेज › National › जुलैमध्ये जीएसटी कर वसुलीत घट!

जुलैमध्ये जीएसटी कर वसुलीत घट!

Last Updated: Aug 01 2020 6:25PM




नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कोरोना संक्रमणाचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला असल्याच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यातील वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी कराच्या वसुलीचे आकडे अपेक्षेपेक्षा कमी आले आहेत. जुलैमध्ये ८७ हजार ४२२ कोटी रुपये इतकी करवसुली झाली असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने शनिवारी दिली. 

एकूण करांपैकी १६ हजार १४७ कोटी रुपये सेंट्रल जीएसटीच्या रूपाने आले असून २१ हजार कोटी रुपये राज्य जीएसटीच्या रूपाने तर ४२ हजार ५९२ कोटी रुपये आय-जीएसटीच्या माध्यमातून आले आहेत. वस्तूंच्या आयातीवरील २० हजार ३२४ कोटी रुपयांचा कर तसेच उपकरापोटी वसूल करण्यात आलेल्या ७ हजार २६५ कोटी रुपयांचाही यात समावेश आहे. गेल्या जून महिन्यात सरकारने ९० हजार ९१७ कोटी रुपयांचा जीएसटी कर वसूल केला होता तर गतवर्षीच्या जुलै महिन्यात १ लाख २ हजार कोटी रुपयांचा जीएसटी कर वसूल करण्यात आला होता.