Thu, Jun 24, 2021 12:12होमपेज › National › हिमालयाच्या कुशीत आगीचा वणवा; तब्बल ७१ हेक्टरवरील वनसंपदा धोक्यात

हिमालयाच्या कुशीत आगीचा वणवा; तब्बल ७१ हेक्टरवरील वनसंपदा धोक्यात

Last Updated: May 27 2020 2:48PM

फोटो-ट्विटरवरूननवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

देशात कोरोना विषाणूच्या महामारीने थैमान घातले असतानाच उत्तराखंडमध्येही कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. उत्तराखंडवर आणखी एक संकट ओढावलं आहे. वाढत्या तापमानामुळे उत्तराखंडच्या जंगलामध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. येथील जंगलामध्ये ४५ हून अधिक घटनेची नोंद झाली आहे. त्यामुळे ७१ हेक्टरहून अधिक जमिनीवर आग लागली आहे. विशेष म्हणजे, जंगलात लागलेल्या आगीमुळे येथील वन्यजीव, वनसंपदा धोक्यात आली आहे. मागील वर्षाप्रमाणे जंगलातील आगीने अल्मोडा, नैनीताल, टिहरी, देहराडून आणि हल्द्वानीमध्ये शेकडो हेक्टर जमीन नष्ट केली होती. 

कुमाऊं क्षेत्रात आगीची कमीत कमी २१ घटना समोर आल्या आहेत. गढवाल क्षेत्रात जंगलात आगीच्या १६ घटना दाखल आहेत. संरक्षित नसलेल्या जंगल क्षेत्रातील आगीच्या ९ घटना घडल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, जंगलातील आगीमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती जखमी झाला आहे. दरम्यान, उत्तराखंडच्या जंगलातील अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटोज जुने आहेत. तसेच यातील काही फोटोज इतर देशांमधीलदेखील आहेत. कृपया अशा भ्रामक वृत्तापासून सावधान राहा, असे ट्विट PIB in Uttarakhand या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले आहे. 

viral Video - Priyank twitter वरून साभार