मोदी सरकारच्या क्रुरतेविरद्ध देशातील शेतकरी उभे ठाकले : राहुल गांधी

Last Updated: Nov 27 2020 6:39AM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

मोदी सरकारच्या क्रुरतेविरद्ध देशातील शेतकरी उभे ठाकले असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केले. केंद्रीय कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेल्या ‘चलो दिल्ली’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली. यावेळी दिल्लीत पोहचू पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या पाण्याच्या फवाऱ्याचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी ट्विटरवर ट्विट केला आहे.

शेतकऱ्यांचे आंदोलन आणि आक्रोश पाहून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या क्रुरतेविरुद्ध देशातील शेतकरी ताठ मानेने उभे असल्याचा दावा केला आहे. 

पंजाबमधील अनेक शेतकरी केंद्राच्या कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी ‘चलो दिल्ली’ मोर्चा काढून दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर हरियाणाने सर्व सीमा पूर्णपणे सील केल्या आहेत. 

शेतकऱ्यांच्या आंदोलनास अनुसरुन एका काँग्रेस नेत्याने एक कविता ट्विट केली आहे, ''नहीं हुआ है अभी सवेरा, पूरब की लाली पहचान, चिड़ियों के जगने से पहले खाट छोड़ उठ गया किसान, काले क़ानूनों के बादल गरज रहे गड़-गड़, अन्याय की बिजली चमकती चम-चम, मूसलाधार बरसता पानी, ज़रा ना रुकता लेता दम...!''