Sun, Oct 25, 2020 07:31होमपेज › National › वाहन नोंदणीसाठी आता फास्टॅग बंधनकारक

वाहन नोंदणीसाठी आता फास्टॅग बंधनकारक

Last Updated: Jul 13 2020 1:58PM
नवी दिल्ली:  पुढारी वृत्तसेवा 

चारचाकी वाहनांची नोंदणी करण्यासाठी आता फास्टॅग बंधनकारक करण्यात येणार आहे. देशभरातील टोल नाक्यांवर वाहनांची लांबच लांब रांग आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने फास्टॅग यंत्रणा सर्व वाहनांसाठी बंधनकारक केली होती. पंरतू, आता केंद्रीय परिवहन मंत्रालयाने फास्टॅग संर्दभातील नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

नव्या नियमानुसार देशभरात चारचाकी वाहनांची नोंदणी करण्यासाठी अथवा वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट जारी करण्यासाठी गाडीवर लावण्यात आलेल्या फास्टॅगची माहिती संबंधितांना उपलब्ध करवून द्यावी लागेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नॅशलन इन्फॉर्मेटिक सेंटरला (एनआयसी) यासंदर्भात पत्र लिहिले आहे. 

वाहन (VAHAN) पोर्टलसह राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल कनेक्शन जोडण्यात आले आहे. १४ मे पासून ही यंत्रणा  कार्यान्वित करण्यात आली आहे. सध्या VAHAN सिस्टिम VIN/VRN च्या माध्यमातून फास्टॅगची माहिती मिळवता येते. नव्या गाडीच्या नोंदणी वेळी फास्टॅगबाबत माहिती असणे गरजेचे असणार आहे. वाहनचालक फास्टॅगचे पेसै इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून देत आहे की नाही? हे तपासून पाहण्याच्या उद्देशाने हे महत्वाचे असल्याचे मत मंत्रालयाने पत्रातून मांडले आहे.

सर्वात प्रथम २०१७ मध्ये 'एम' आणि 'एन' श्रेणी अंतर्गत विक्री केलेल्या नव्या वाहनांवर फास्टॅग अनिवार्य करण्यात आले होते. पंरतू,अजूनही बहुतांश नागरिकांनी फास्टॅग बँकेसोबत लिंक केले नाही. महत्वाची बाब म्हणजे देशातील कोरोनाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फास्टॅगचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, फास्टॅग संदर्भात फसवणूक होत असल्याचे ही प्रकार समोर आले आहेत.  त्यामुळे फास्टॅग रिचार्ज अथवा इतर कुठली माहिती जाणू घ्यायची असेल तर ते फोन कॉलिंगच्या माध्यमातून करु नये. नेहमीच कस्टमर केअरवर स्वत:हून फोन करुन या सुविधेचा लाभ घ्या, असे आवाहन देखील मंत्रालयकडून करण्यात आले आहे. 

 "