Tue, Oct 22, 2019 20:00होमपेज › National › इलेक्ट्रीक वाहन घेत आहात? तर आपल्यासाठी मोठी खुशखबर!

इलेक्ट्रीक वाहन घेताय? तर मग मोठी खुशखबर!

Last Updated: Oct 10 2019 5:56PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी खास सरकारने एक नवीन योजना तयार केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय इलेक्ट्रीक वाहनांना टोल रक्कमेमध्ये ५० टक्क्यांपर्यत सूट देण्याचा विचार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही सूट केवळ पाच वर्षासाठीच असणार आहे.   

हा प्रस्ताव सरकारने इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रीक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी सरकारने ही योजना राबवणार आहे. तर सध्या सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटीमध्ये कपात केली आहे.  

परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले होते की, सरकारने इलेक्ट्रीक वाहनांवर कोणतीही मुदत निश्चित केली नाही. याशिवाय भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ने हा प्रस्ताव केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाला पाठविला आहे. लवकरच या प्रस्तावाला नितिन गडकरीची सहमती मिळण्याची आशा आहे. 

पाच वर्षासाठी मिळणार सूट

सूत्राच्या माहितीनुसार,एनएचएआयने टोल शुल्कामध्ये इलेक्ट्रीक वाहनांना सूट देण्याचे सुचवले असले, तरी एनएचएआयलाही या सवलतींचा त्रास सहन करावा लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांना इलेक्ट्रीक वाहने खरेदी करण्यास प्रेरणा मिळणार आहे. ही योजना लागू झाल्यानंतर इलेक्ट्रीक वाहनांना सूट पहिल्या पाच वर्षांसाठी मिळणार आहे.