Tue, Aug 04, 2020 13:41होमपेज › National › महाराष्ट्रात संघर्ष सुरु असतानाच केजरीवाल सरकारने घेतला मोठा निर्णय!

महाराष्ट्रात संघर्ष सुरु असतानाच केजरीवाल सरकारने घेतला मोठा निर्णय!

Last Updated: Jul 11 2020 4:22PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

दिल्ली सरकारच्या अखत्यारितील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच असल्याने या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मनीष शिसोदिया यांनी सांगितले. 

वाचा : कोरोना नष्ट होणे अशक्य; WHO ने दिली धोक्याची सूचना

दिल्ली सरकारच्या सर्व विद्यापीठांतील परीक्षा यंदा घेतल्या जाणार नाहीत. अंतर्गत परीक्षांतील कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाईल, असे सांगून मनीष शिसोदिया यांनी पुढे म्हटले की, 'केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या विद्यापीठांनी देखील अशा प्रकारे अंतर्गत कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे गरजेचे आहे. अर्थात याबाबतचा सर्वस्वी निर्णय केंद्राला घ्यावयाचा आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा रद्द करणे हाच एक उपाय राहिला आहे.' 
वाचा : अरुणाचल प्रदेशमध्ये सहा बंडखोर ठार