नवी दिल्ली ः पुढारी ऑनलाईन
दिल्ली हिंसाचारानंतर सर्व स्तरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. काहींनी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामध्ये भाजपचेच राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्याच पक्षातील सर्वोच्च असणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
वाचा ः मिर्झापूरचा 'मुन्ना' आता दिसणार हटके भूमिकेत
सुब्रमण्यम स्वामी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, "एक चर्चा सुरू आहे. कदाचिच ती खोटीही असू शकते किंवा शत्रूच्या खोट्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पसरविण्यात आली असेल. पंतप्रधान कार्यालयाच्या जवळ असलेल्या भाजपच्या एका सदस्यानं लाल किल्ल्यावर सुरू असलेल्या गोंधळात लोकांना भडकविण्याचं काम केलेलं आहे. तपासणी करून माहिती द्यावी", अशा आशयाचं ट्विट करून स्वामींनी स्वतःच्याच पक्षावर निशाणा साधला आहे.
वाचा ः संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून
"या घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेचं मोठं नुकसान झालं आहे. इतकंच नाही देशाच्या प्रतिमेचंही मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर आंदोलन करणाऱ्या नेत्यांनीही आपला विश्वास गमवला आहे", असंही ट्विट स्वामी यांनी केलं आहे.