Thu, Apr 02, 2020 00:02होमपेज › National › पालकांनी, शिक्षकांनी मुलांच्या क्षमता ओळखायला हव्यात : पंतप्रधान

पालकांनी, शिक्षकांनी मुलांच्या क्षमता ओळखायला हव्यात : पंतप्रधान

Last Updated: Jan 20 2020 1:13PM

पीएम मोदींचा विद्यार्थ्यांशी संवादनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'परीक्षा पे चर्चा 2020' या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. फेब्रुवारी, मार्चमध्ये देशभरातील अनेक राज्यांमध्ये लवकरच दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर अभ्यासाबाबत निराश आणि हताश होणाऱ्या विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी करणार आहेत.

'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान मोदी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आहेत. परीक्षा आणि विद्यार्थ्यांवर येणार ताण या विषयावर पंतप्रधान मोदींची विद्यार्थ्यांसोबत चर्चा सुरु आहे.

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी एका निबंध स्पर्धेच्या माध्यमातून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची निवड केली गेली आहे. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर निबंध लिहिले. दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमासाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

जर तुम्ही तणाव घेऊन परीक्षा केंद्रावर गेलात तर योग्य होणार नाही. पूर्ण आत्मविश्वासानंच तुम्ही परीक्षा द्यायला हवी : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

पालकांनी, शिक्षकांनी मुलांच्या क्षमता ओळखायला हव्यात : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

'टेक्नॉलॉजी फ्री अवर' करायला हवे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

तंत्रज्ञानाला स्वतःच्या जीवनाचा भाग होऊ देऊ नका. दिवसातून एक तास तरी तुम्ही तंत्रज्ञनापासून दूर रहायला हवे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

तंत्रज्ञानाचे भय बाळगू नका, त्याचे गुलाम बनू नका- पंतप्रधान

 तंत्रज्ञानाने आपल्यावर कब्जा करता कामा नये : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

तंत्रज्ञनाला आपला मित्र मानले पाहिजे, तंत्रज्ञान माझ्यासाठी उपयोगी कसे असेल याचा विचार आपण केला पाहिजे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

तंत्रज्ञानाचे भय बाळगू नका: पंतप्रधान नरेंद्र मोदी 

परीक्षेप्रमाणे पालक आता मुलांच्‍यावर एकस्‍ट्रा ॲक्टिव्हिटीसाठी देखील दबाव टाकतात : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

मुलांच्‍या शाळेतील एकस्‍ट्रा ॲक्टिव्हिटी पालकांसाठी फॅशन बनली आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

अपयशातूनच यशकाडे जाण्‍याचा मार्ग असतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

अपेक्षा पूर्ण न झाल्‍यास मूड खराब करुन घेवू नये : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

मूडऑफ का होतो याचा विचार केला आहे का : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

२०२० नवीन वर्ष नाही तर नवीन दशक आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

यंदाचे दशक भारतासाठी खूप महत्‍त्‍वाचे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

 सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

 विविध शाळांमध्‍ये  'परीक्षा पे चर्चा 2020'  या कार्यक्रमाचे प्रेक्षेपण

पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना देणार तणावमुक्‍तीचे धडे