Mon, Aug 03, 2020 14:54होमपेज › National › शांततापूर्ण आंदोलनासाठी परवानगीची काय गरज?

शांततापूर्ण आंदोलनासाठी परवानगीची काय गरज?

Last Updated: Jan 15 2020 12:21AM
नवी दिल्ली :

दरियागंज हिंसाचारप्रकरणी सुनावणी करताना दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने पोलिसांना फटकारले आहे. जामा मशिदीसमोर शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना पोलिसांना अडचण काय  होती? आंदोलन रोखायला जामा मशीद  पाकिस्तानात आहे काय, असा सवाल न्यायालयाने पोलिसांना केला आहे.

 न्यायालयाने म्हटले आहे की, धार्मिक स्थळांबाहेर आंदोलन करू नये, असे कुठल्या कायद्यात म्हटले आहे? लोक कुठेही शांततेच्या मार्गाने आंदोलन करू शकतात. चंद्रशेखर आझाद यांनी आंदोलन केले तर काय अडचण होती? यावेळी न्यायालयाने भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद हे उगवते नेतृत्व असल्याचेही म्हटले आहे.