Mon, Mar 08, 2021 17:41
कोरोना लसीकरण ः कोरोनाची लस कोणाला मिळणार मोफत अन् कोणाला मोजावे लागणार पैसे... जाणून घ्या

Last Updated: Feb 23 2021 10:59AM

नवी दिल्ली ः पुढारी ऑनलाईन 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात कोरोनाचं लसीकरण सुरू आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांचं लसीकरण केलं जात आहे. यानंतर लगेचच ५० वर्ष आणि त्याहून जास्त वय असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लस टोचली जाणार आहे.

वाचा ः अँटिबॉडीज् विकसित झालेल्या व्यक्तींनाही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका

देशभरात ५० वर्षांपासून अधिक वय असणाऱ्यांची संख्या ही २७ कोटींच्या आसपास आहे, तर या सर्व वृद्धांना दुसऱ्या टप्प्यात कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यातही ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना लसीकरणामध्ये प्राथमिकता दिली जाणार आहे.

वाचा ः येरवडापाठोपाठ आता ठाणे तुरुंगातही पर्यटन 

या लसीकरणात नागरिकांचे दोन समूह विभागले जाणार असून त्यातील एका गटाला कोरोनाची लस ही मोफत दिली जाणार आहे तर, दुसऱ्या समूहाला लस घेण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. ज्यावेळी लसीकरणासाठी नोंदणी करतील, तेव्हा त्यांना बघावं लागणार आहे की, त्यांना कोरोनाची लस ही मोफत मिळाणार आहे की विकत. कारण, सरकारकडून कोणत्या गटाला लस मोफत दिली जाणार आहे, हे निश्चित केली जाणार आहे.