Mon, Mar 08, 2021 18:54
कोरोना : पंतप्रधान कार्यालयात बोलवली तातडीची बैठक 

Last Updated: Feb 23 2021 6:28PM

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली असून पंतप्रधान कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलविली आहे. या बैठकीत देशभरातील कोरोनाचा आढावा घेण्यात येणार आहे.

वाचा : सांगली महापालिका: जयंत पाटलांनी केला चंद्रकांत पाटलांचा दुसऱ्यांदा ‘कार्यक्रम

मागच्या काही दिवसांपासून देशात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात बैठक सुरू आहे. करोनाच्या महाराष्ट्रातील नव्या स्ट्रेनने चिंता वाढवली आहे. या नव्या स्ट्रेनमुळे देशात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

वाचा : कोरोना : बुलडाण्यात आज  ४१६ नवे पॉझिटिव्ह 

काही राज्यांमध्ये करोना रुग्ण संख्या वाढली आहे. काही ठिकाणी नवीन स्ट्रेन आढळून आले आहेत. कोरोना विषाणूमध्ये परिवर्तन आहे.  महाराष्ट्राशिवाय केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पंजाबमध्येही करोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. विषाणूच्या जनुकीय रचनेसंदर्भात चाचणीसाठी महाराष्ट्र आणि केरळमधून ८०० ते ९०० नमुने पाठवण्यात आले आहेत.

रुग्णांची वाढती संख्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलविली आहे. या बैठकीला आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. 

वाचा : सात जणांची निर्दयी कत्तल करणाऱ्या शबनमची फाशी टळली