Fri, Sep 18, 2020 13:11होमपेज › National › काँग्रेस नेते राजीव त्यागी यांचे निधन

काँग्रेस नेते राजीव त्यागी यांचे निधन

Last Updated: Aug 12 2020 8:23PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचे हदयविकाराने निधन झाले. गाजियाबाद त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांना बुधवारी संध्याकाळी टीव्ही चर्चेदरम्यानच हृदयविकाराचा झटका आला असल्याचे बोलले जात आहे. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना गाझियाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालली. काँग्रेस सचिव डॉ.विनीत पूनिया यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल माहिती दिली. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनीही ही माहिती मिळाल्यानंतर शोक व्यक्त केला.

त्यागी यांनी बुधवारी साडेचारच्या सुमारास आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले होते. निधनाबद्दल माहिती देताना डॉ. पूनिया यांनी ट्वीट केले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. राजीव त्यागी राहिले नाहीत. त्यांच्या कुटुंबीय आणि चाहत्यांविषयी माझ्या मनापासून संवेदना आहेत.

राजीव त्यागी यांनी भाजपच्या संबित पात्रांशी त्यांनी केलेली अनेक चर्चा अत्यंत धारदार होत असत. ते तथ्यपूर्ण मुद्दे ठेवण्याबरोबरच काँग्रेसला अनोख्या मार्गाने पाठिंबा देण्यासाठीही प्रसिद्ध होते.

 "