सोनिया गांधींकडून मोठा निर्णय! गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी हार्दिक पटेल यांची वर्णी!

Last Updated: Jul 11 2020 9:03PM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


गांधीनगर : पुढारी ऑनलाईन 

बऱ्याच काळापासून गुजरातमध्ये अंतर्गत संघर्षाने बेजार झालेल्या काँग्रेसने हार्दिक पटेल यांना राज्याचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. हार्दिक पटेल यांच्या अचानक झालेल्या जबाबदारीमागील काँग्रेसची मोठी चाल असू शकते. पाटीदार आरक्षण चळवळीतून राजकारणात प्रवेश केलेल्या हार्दिक पटेल यांच्यावर अनके खटले सुरू आहेत. हार्दिक पटेलही बऱ्याच काळापासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. 

अधिक वाचा : ड्रॅगनचा निर्लज्जपणा! वंदे भारत रेल्वे सेवेसाठी चिनी कंपनीची निविदा

सोनिया गांधींकडून मोठा निर्णय!

तत्काळ प्रभावाने त्यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी  यांनी हा निर्णय घेतला आहे.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये दाखल झाले. 12 मार्च 2019 रोजी गांधीनगर जिल्ह्यातील मेळाव्यात राहुल गांधींनी स्वत: हार्दिक पटेल यांना त्यांच्या उपस्थितीत पक्षात समाविष्ट केले होते. यावेळी हार्दिक पटेल म्हणाले होते की, 'लोक मला विचारतात की मी काँग्रेस आणि राहुल गांधी का निवडले. मी राहुल गांधी यांना निवडले कारण ते प्रामाणिक आहेत. हुकूमशहाप्रमाणे वागण्यावर त्याचा विश्वास नाही. '

अधिक वाचा : ‘राजस्थानात काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी आमदारांना २५-२५ कोटींची ऑफर’

2019 च्या लोकसभा निवडणुकीत हार्दिक पटेल यांनी जामनगर जागेवरून निवडणूक लढवण्याचा विचार केला होता. 2015 मध्ये गुजरातमधील हिंसाचारात त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. याप्रकरणी ते उच्च न्यायालयातही गेले. परंतु, त्यांना दिलासा मिळाला नाही आणि निवडणूक लढवता आली नाही. हार्दिक पटेल यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे गुजरात सरकारने स्वतः म्हटले होते. त्यांच्यावर देशद्रोहाच्या दोन गुन्ह्यांसह 17 एफआयआर दाखल आहेत.

अधिक वाचा : भारताच्या वाघांवरील सर्वेक्षणाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद!