Fri, Jul 10, 2020 09:05होमपेज › National › ‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती

‘रालोआ’तील मतभेद मिटवण्यासाठी समिती

Last Updated: Nov 18 2019 1:47AM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) चा परिवार मोठा आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या मतभेदांमुळे रालोआमधील घटकपक्षांनी वाद वाढवू नयेत, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. रालोआमधील वाद मिटविण्यासाठी निमंत्रक नियुक्त करण्यात येणार असल्याचेही मोदी यांनी नमूद केले.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रालोआ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना रालोआमधून बाहेर पडला असून झारखंडमध्ये लोकजनशक्ती पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले की, रालोआ आपल्यासाठी मोठा परिवार आहे. विविध विचारसरणीच्या पक्षांचा रालोआमध्ये समावेश आहे. 130 कोटी देशवासियांचे प्रतिक म्हणून रालोआकडे पाहिले जाते. रालोआमध्ये म्हणजेच भारतीय विविधतेचा आविष्कार आहे.

त्यामुळे मतभेद होणे संभवणीय असले तरी छोट्या मोठ्या कुरबरीवरून वाद वाढवू नयेत. मतभेद दूर करायला हवेत. छोट्या बाबींवरून कुणीही अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. रालाओमधील मतभेदावर चर्चा करण्यासाठी निमंत्रक अर्थात समिती नियुक्ती करण्यात येईल,असेही त्यांनी नमूद केले.