Thu, Aug 13, 2020 16:57होमपेज › National › ड्रॅगनचा निर्लज्जपणा! वंदे भारत रेल्वे सेवेसाठी चिनी कंपनीची निविदा

ड्रॅगनचा निर्लज्जपणा! वंदे भारत रेल्वे सेवेसाठी चिनी कंपनीची निविदा

Last Updated: Jul 11 2020 5:42PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

वंदे भारत प्रकल्पाअंतर्गत आगामी काळात ४४ मार्गावर रेल्वे सेवा चालविल्या जाणार आहेत. यासाठी एका चिनी कंपनीनेही निविदा भरली असल्याची माहिती समोर आली आहे. सेमी हाय स्पीड वेगाने चालविल्या जाणाऱ्या ट्रेन १८ मोहिमेचे नवे नाव वंदे भारत एक्स्प्रेस असे करण्यात आले आहे. 

आणखी वाचा : अमेरिका पुन्हा करणार अण्वस्त्रनिर्मिती 

वंदे भारत एक्स्प्रेससाठी ज्या चिनी कंपनीने निविदा भरली आहे, त्याचे नाव सीआरआरसी कॉर्पोरेशन असे आहे. गुरुग्राम येथील एका कंपनीसोबत जॉईंट व्हेनचेर करून सीआरआरसी कॉर्पोरेशनने निविदा भरली आहे. सीआरआरसी पायोनीअर इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाने ही निविदा भरण्यात आली आहे. ४४ गाड्यासाठी इलेक्ट्रिक ट्रक्शन किट निविदाधारकांना पुरवावे लागणार आहेत. 

आणखी वाचा : दोन औषधांच्या संयुक्‍त वापराने एड्स रुग्ण बरा! 

ट्रेन सेट टेंडरसाठी एकूण सहा कंपन्यांनी निविदा भरली असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोदकुमार यादव यांनी दिली. अन्य ज्या कंपन्यांनी निविदा भरली आहे, त्यात भारत हेवी इलेक्ट्रीकल, मेधा ग्रुप, इलेक्ट्रोवेव इलेक्ट्रॉनिक प्रा. लिमिटेड, पॉवरनेटिक्स इक्यूपमेंटस प्रा. लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे. जागतिक पातळीवर अग्रणी असलेल्या बोम्बार्डीयर, अलस्थम, सीमेन्स, सीएएफ, टालगो, मित्सुबिशी या कंपन्यानी निविदेत सहभाग घेतलेला नाही.

आणखी वाचा : सीएम उद्धव ठाकरेंनी धारावीत करून दाखवलं! थेट जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुकाची थाप!

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये लडाखच्या गलावान खो-यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर भारताने चीनविरोधात आक्रमक पवित्रा घेत ५९ चिनी कंपन्यांच्या अॅपवर बंदी घातली.  त्यानंतर भारतीय राजमार्ग योजनांमध्ये चिनी कंपन्यांना बंदी घालण्यात आली. तसेच भारतीय किंवा अन्य कंपनीसह जॉईंट वेंचर करीत बोली लावणाऱ्या चिनी कंपन्यांनाही अटकाव करण्यात येणार आहे. तसेच लघू, मध्यम आणि सुक्ष्म (एमएसएमई) उद्योगांमध्ये चिनी कंपनी आणि त्यांच्या गुंतवणुकीवर बंदी आणण्यात आली. याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. हा चीनसाठी दुसरा मोठा झटका होता. 

आणखी वाचा : 'त्यामुळे' द्युती चंदला विकावी लागणार गाडी!