गुदद्वारात जवळपास दोन किलो सोने लपवून आणणारे दोघे कस्टम अधिकाऱ्यांच्या ताब्यात 

Last Updated: Jan 14 2021 12:46PM

प्रातिनिधीक फोटोचेन्नई : पुढारी ऑनलाईन 

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोघांना १.४२ किलो सोन्याची तस्करी करताना बुधवारी अटक करण्यात आली. विशेष म्हणजे हे दोघे सोने आपल्या गुदद्वारामध्ये लपवून भारतात येत होते. या सोन्याची किंमत जवळपास ७२.६ लाख इतकी आहे. 

चेन्नईच्या विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून या दोघांकडून जप्त केलेल्या सामानात ७२.६ लाख किमतीचे सोने आणि १२.४ लाख किमतीची सिगारेट, स्मार्ट फोन, लॅपटॉप आणि दारु असा ८५ लाखांचा कर चुकवून आणण्यात येणारा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  

गुदद्वारामध्ये लपवून सोने तस्करी करणारे हे दोघे दुबईहून ६ ई ८२४६ या विमानाने चेन्नई विमानतळावर दाखल झाले होते.