Fri, Nov 27, 2020 22:56होमपेज › National › गॅस बुकिंगच्या नियमात रविवारपासून बदल

गॅस बुकिंगच्या नियमात रविवारपासून बदल

Last Updated: Nov 01 2020 1:03AM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकिंग आणि डिलिव्हरी नियमात करण्यात आलेले बदल रविवारपासून अंमलात येत आहेत. गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक येईल. हा क्रमांक डिलिव्हरी घेतेवेळी सांगावा लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे गॅस सिलेंडरचे नवे दरही रविवारी तेल कंपन्याकडून जाहीर केले जाणार आहेत.

ज्या लोकांकडे इंडेनची जोडणी आहे, त्यांना बुकिंगसाठी नव्या नंबरचा वापर करावा लागेल. ग्राहकांना यापुढे गॅस बुकिंगसाठी 7718955555 हा नंबर डायल करावा लागेल. दरम्यान गॅस सिलेंडरचे नवे दरही रविवारी जाहीर केले जाणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात गॅस दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. दुसरीकडे व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर दरात वाढ करण्यात आली होती. 

रेल्वेचे वेळापत्रकही बदलणार...

दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी रेल्वेचे वेळापत्रक बदलते. यंदा हे वेळापत्रक एक महिना उशिराने म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी बदलत आहे. कोरोना संकटामुळे सध्या रेल्वेच्या नियमित सेवा बंद असल्या तरी विशेष गाड्या चालवून प्रवाशांची सोय केली जात आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून नवीन विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेतच पण विद्यमान गाड्याची संख्या वाढवत क्लोन गाड्याही सुरू करण्यात आलेल्या आहेत.