Thu, Jun 24, 2021 11:15
तमिळनाडू : स्टॅलिन यांनी शपथ घेतल्या घेतल्या प्रत्येक कुटुंबाला ४ हजार कोरोना सहाय्यता निधी देण्याची केली घोषणा 

Last Updated: May 07 2021 4:45PM

चेन्नई : पुढारी ऑनलाईन 

डीएमकेचे सर्वेसर्वा एमके स्टॅलिन यांनी आज (दि. ७) तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी लगेचच आपला कर्यभार स्विकारत राज्यातील प्रत्येक रेशनकार्ड धारक कुटुंबाला ४ हजार रुपये सहाय्यता निधी देण्याची घोषणा केली. स्टॅलिन यांनी या सहाय्यता निधीचा पहिला २००० रुपयांचा हप्ता मे महिन्यात देणार असल्याचे आश्वासन दिले. 

तुम्ही आत्तापर्यंत ऑक्सिजन आणि इतर सुविधांसाठी पथके का पाठवली नाहीत? सीएम ममता भडकल्या

स्टॅलिन यांनी राज्य सरकारच्या राशन कार्डधारकांचा सल्लग्नित खासगी रुग्णालयामधील कोरोनावरील उपचारांचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचीही घोषणा केली. आज राज भवनात शपथ घेतल्यानंतर स्टॅलिन यांच्या मंत्रीमंडळाने घेतलेला हा पहिला निर्णय आहे. 

केंद्र सरकार लशींच्या दोन डोस दरम्यान अंतर वाढवण्याच्या तयारीत!

आज मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याबरोबरच पक्षाच्या ३३ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात १९ माजी मंत्र्यांच्या तर १५ नव्या मंत्र्यांचा समावेश आहे. नव्या मंत्रीमंडळात दोन महिलांचाही समावेश आहे, त्यांनी पहिल्यांदाच मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. स्टॅलिन यांचा मुलागा उदयननिधी यांचा शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये समावेश नव्हता.