Sat, Sep 19, 2020 07:37होमपेज › National › सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना दिलासा! नववी, बारावीच्या अभ्यासक्रमात ३० टक्के कपात

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना दिलासा! नववी, बारावीच्या अभ्यासक्रमात ३० टक्के कपात

Last Updated: Jul 07 2020 9:56PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) विद्यार्थ्यांना आणखी दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे सर्वच शाळांना ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. यामुळे दिवसाचे काही तास विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण करणे अशक्य बनले आहे. यामुळे सीबीएसईने अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नववी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय असून त्यांचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. अभ्यासक्रमातील काही मुलभूत बाबी वगळता ३० टक्के कपात करण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे मंत्री रमेश पोखरीयाल यांनी जाहीर केला आहे. मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर लगेचच सीबीएसईने अभ्याक्रम वगळल्याचे पत्रक ट्विट करून याची माहिती दिली.

यापूर्वी, कोरोना साथीमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि सीबीएसईला परवानगी दिली आहे. न्या. ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या पीठाने सीबीएसईला परीक्षा रद्द करण्यासाठी एक अधिसूचना जारी करण्यास परवानगी दिली होती.
 

 "