Sun, May 31, 2020 11:29होमपेज › National › बंगालच्या उपसागरात बुलबुल चक्रीवादळ 

बंगालच्या उपसागरात बुलबुल चक्रीवादळ 

Last Updated: Nov 08 2019 11:08PM
कोलकाता : वृत्तसंस्था 
बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले चक्रीवादळ पुढील दोन दिवसांत रौद्ररूप धारण करण्याची शक्यता असल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा किनार्‍यावर फटका बसण्याची शक्यता आहे. बुलबुल असे या वादळाचे नाव आहे. या वादळाचा फटका बांगलादेश किनार्‍यालाही बसू शकतो.

हवामान विभागाच्या माहितीनुसार बुलबुल चक्रीवादळ कोलकातापासून आग्‍नेय दिशेला 930 किलोमीटरवर आहे. शनिवारी वादळाची तीव्रता आणखी वाढू शकते. ज्यामुळे समुद्रात प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे चक्रीवादळ पश्‍चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनार्‍याच्या दिशेने सरकरण्याची शक्यता आहे. बुलबुल चक्रीवादळ 70 ते 80 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने पुढे सरकत आहे. तर चक्रीवादळाच्या केंद्रस्थानी त्याचा वेग 90 किलोमीटर प्रतितास एवढा आहे. त्यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांनी परत येण्याचे तसेच पुढचे आदेश मिळेपर्यंत समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे.