Sat, Sep 19, 2020 08:57होमपेज › National › ब्लॅक लिस्ट तबलिगी परत जाऊ शकणार नाहीत 

ब्लॅक लिस्ट तबलिगी परत जाऊ शकणार नाहीत 

Last Updated: Jul 02 2020 10:14PM

प्रातिनिधीक फोटोनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

तबलिगी जमातच्या कारवायांमध्ये कथितरित्या सहभागी झाल्याच्या कारणाने ब्लॅक लिस्ट केलेले 2500 परदेशी नागरिक सध्या त्यांच्या देशात परत जाऊ शकणार नाहीत, अशी माहिती केंद्र सरकारने गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. 

या नागरिकांविरोधात भारतातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या खटल्यांची सुनावणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांची त्यांच्या देशात घरवापसी केली जाऊ शकत नाही, असे सरकारने सांगितले आहे. 

गत सुनावणीत न्यायालयाने सुनावणी 2 जुलैपर्यंत पुढे ढकलून याबाबत केंद्राकडे उत्तर मागितले होते. कोरोनाबाबतच्या दिशानिर्देशांचे या नागिरकांनी उल्लंघन केले होते. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावर सुनावणी होणे बाकी आहे. केंद्र सरकारने 35 देशांच्या या 2500 नागरिकांना ब्लॅक लिस्ट करत त्यांचे व्हिजा रद्द केले आहेत. पुढील सुनावणी 10 जुलै रोजी होणार आहे. 

 "