Sat, Nov 28, 2020 18:59होमपेज › National › ‘राजस्थानात काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी आमदारांना २५-२५ कोटींची ऑफर’

‘राजस्थानात काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी आमदारांना २५-२५ कोटींची ऑफर’

Last Updated: Jul 11 2020 5:21PM
जयपूर : पुढारी ऑनलाईन

राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्यात भाजपचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आमदारांचा घोडेबाजार सुरू असून २५-२५ कोटींची ऑफर देण्यात येत आहे, असा गंभीर आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे. 

अधिक वाचा : भारताच्या वाघांवरील सर्वेक्षणाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद!

गहलोत म्हणाले की, सतीश पुनिया आणि राज्यवर्धन सिंह राठोड हे भाजप नेते केंद्रीय नेतृत्वाच्या इशाराऱ्यावर राजस्थानामधील काँग्रेसचे सरकारचा गेम करण्यात आघाडीवर आहेत. या घोडेबाजारादरम्यान आमदारांना १०-१० कोटी रुपये अॅडव्हान्समध्ये दिले जातील व सरकार पडल्यानंतर उर्वरीत १५-१५ कोटी रुपये देण्याचा लोभ दाखवला जात आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

अधिक वाचा : महाराष्ट्रात संघर्ष सुरु असतानाच केजरीवाल सरकारने घेतला मोठा निर्णय!

काँग्रेसमधील गटबाजीवरही गहलोत यांनी टिप्पणी केली. ते म्हणालेकी, मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायला कुणाला आवडणार नाही? पक्षात पाच ते सात जण मुख्यमंत्री पदासाठी पात्र आहेत. मात्र, त्यापैकी एकच मुख्यमंत्री होऊ शकतो. पण मुख्यमंत्रीपदी नेत्याची निवड झाल्यानंतर बाकीचे शांत बसतात. पण असे होताना दिसत नाही.

अधिक वाचा : कोरोना नष्ट होणे अशक्य; WHO ने दिली धोक्याची सूचना

आमदारांच्या घोडेबाजार प्रकरण चांगलेच तापले आहे. राज्यातील सरकार पाडण्यासाठी या दोन मोबाइल नंबरवरून आमदारांशी संपर्क साधला गेला असून त्यांना ऑफर दिली गेली, असा आरोप करण्यात आला आहे. या घोडेबाजार प्रकरणी आणि सरकार अस्थिर करण्याप्रकरणी ते दोन मोबाईल नंबर ट्रॅक केले गेले आहेत. राज्याच्या विशेष पोलिस दलाने (एसओजी) शुक्रवारी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी मुख्यमंत्री गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना आपले जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. राज्यातील विधानसभेच्या २०० आमदारांपैकी १०७ काँग्रेसचे आहेत तर ७२ भाजपचे. तर राज्यातील १३ पैकी १२ अपक्ष आमदारांचा पाठिंबा काँग्रेसला आहे.

अधिक वाचा : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा होम क्‍वारंटाईन

राजस्थाममधील काँग्रेसच्या गहलोत सरकारने मागील महिन्यातच आमदारांचा घोडेबाजार होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा असा आरोप करण्यात आला आहे. १९ जूनला राजस्थानमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने विशेष पोलिस दलाकडे आपल्या आमदारांना कोट्यवधींची ऑफर दिली जात असल्याची तक्रार दाखल केली होती. 

अधिक वाचा : 'कोरोना हे १०० वर्षांतील आरोग्य, अर्थव्यवस्थेवरील सर्वांत मोठे संकट'