Tue, Jul 14, 2020 08:31होमपेज › National › मोदी सरकारही आता काँग्रेसच्या वाटेवर : मायावती 

मोदी सरकारही आता काँग्रेसच्या वाटेवर : मायावती 

Last Updated: Jan 15 2020 10:29AM

बसपा प्रमुख मायावतीलखनौ : पुढारी ऑनलाईन 

आपल्या देशाची परिस्थिती बदलेल असे वाटत होते. पण असे होताना आज दिसत नाही. आपल्या देशाची स्थिती काँग्रेसच्या काळात खराब होतीच तर मोदींच्या काळातही यात बदल झाला नाही, अशी टीका बसपा प्रमुख मायावती यांनी केली आहे. त्यांनी यावेळी काँग्रेससह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला आहे. बसपा प्रमुख मायावतींचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत आपल्या कार्यकर्त्यांशी आणि देशवासीयांशी संवाद साधला. तर यावेळी मायावतींनी नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या.  

अधिक वाचा : काही क्रिकेटपट्टूंवर हनीट्रॅपचा प्रयत्न? 

यावेळी केंद्र सरकारवर हल्ला चढवताना मायावती म्हणाल्या, केंद्रातील मोदी सरकारही काँग्रेसच्या वाटेवर चालत आहे. केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करीत आहे त्यामुळे देशाचे वातावरण अराजकमय होत आहे. काँग्रेसच्या काळात असे काही झाल्यास आम्ही त्यावेळीही विरोध करत होतो आणि अजूनही करत आहेत, असेही मायावती म्हणाल्या. तसेच देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. देशावर मंदीचे सावट असल्याचेही त्या म्हणाल्या. 

अधिक वाचा : शांततापूर्ण आंदोलनासाठी परवानगीची काय गरज?

तसेच त्यांनी आपल्या वाढदिवासादिनी कार्यकर्ते दरवर्षी गरीब लोकांना मदत करतात. मी या सर्वांचे आभारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.