Fri, Sep 18, 2020 13:02होमपेज › National › बघताच क्षणी डोळ्यात भरेल ‘रामलल्लां’चे मंदिर

बघताच क्षणी डोळ्यात भरेल ‘रामलल्लां’चे मंदिर

Last Updated: Aug 04 2020 9:47PM
अयोध्या : पुढारी ऑनलाईन 

१) अनेक किलोमीटर दुरवरून अयोध्येतील भव्य, दिव्य राम मंदिर दुष्टिपथात येईल असे भव्यत्व रामलल्लांच्या मंदिराला देण्यात येईल. तीन दशकांपूर्वीच्या विश्व हिंदू परिषदेच्या प्रस्तावित राम मंदिराच्या नकाशात त्यामुळे थोडाफार बदल करण्यात आला आहे. प्रस्तावित मंदिरांची उंची देखील वाढवण्यात आली आहे. विहिपिच्या पूर्वीच्या नकाशात बदल करीत प्रस्तावित मंदिरात आणखी एक मजला वाढवण्यात आला आहे. एक मंडप तसेच एक अतिरिक्त मजल्यासह ३५ फुट उंच शिखांचा विस्तार करण्यासंबंधी न्यासाकडून विचारमंथन सुरु आहे. यासह राम मंदिरात तीन ऐवजी पाच घुमट राहतील.

२) राम मंदिर तीन मजली राहणार आहे. रामलल्लांची मूर्ती तळ मजल्यावर विराजमान असेल. विश्व हिंदू परिषदेच्या विद्यमान राम मंदिराच्या मॉडेलची उंची १४१ फूटांहून एवढी प्रस्तावित होती. मंदिराची उंची आता १६१ फुट करण्यात येईल. मंदिरात जाण्यासाठी ५ दरवाजे (सिंह द्वार, नृत्यू मंडप, रंग मंडप, पूजा कक्ष तसेच गर्भगृह) असतील.

मंदिराची लांबी जवळपास २७० मीटर, रुंदी १४० मीटर असेल. प्रत्येक मजल्यावर १०५ खांब असतील. पहिल्या मजल्यावर खांबांची लांबी जवळपास १६.५ फूट तर दुसर्या मजल्यावर १४.५ फूट प्रस्तावित आहे. प्रत्येक मजला १८५ खांबावर टिकलेला असेल.

३) मंदिर उभारणीत लोखंडाचा उपयोग करण्यात येणार नाही. मंदिरात संगमरवरी दगडाची फ्रेम तसेच लाकडी दरवाजा असेल. संपूर्ण मंदिराच्या बांधकामात जवळपास १.७५ लाख घन फुट दगडाची आवश्यकता पडेल. मंदिराच्या फरशीवर संगमरवरी दगडाचा उपयोग केला जाईल. हे मंदिर जवळपास २२१ खांबांच्या सहाय्यावर उभे राहील. मंदिर प्रवेशाचे मुख्य पाच प्रवेशासह एकूण २४ द्वार बनवण्यात येतील. मंदिराच्या प्रत्येक खांबांवर १२ देवी-देवतांच्या मुर्तीचे कोरीव नक्षीकाम केले जाईल.

४) नागर शैलीत उभारण्यात येणारे हे अष्टकोणीय मंदिर राहणार आहे. मंदिरात भगवान श्रीरामांची मूर्ती तसेच राम दरबार राहील. मुख्य मंदिराच्या मागील तसेच पुढील भागात सीता, लक्ष्मण, भरत तसेच गणपती बाप्पाची
प्रतिष्ठापणा करण्यात येईल. अक्षरधाम मंदिराच्या शैलीत राममंदिर उभारण्यात येईल. मंदिर परिसरात संत निवास, शोध केंद्र, कर्मचार्यांची निवास व्यवस्था, भोजनालय इत्याची उभारण्यात येणार आहे.
 
५) मंदिराच्या बांधकामासाठी जवळपास अडीच ते तीन वर्षाचा कालावधी लागेल. अंदाजे २०२४ पर्यंत मंदिराचे बांधकाम पुर्णत्वास येईल, असे विश्वास अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 "