Thu, Aug 06, 2020 04:17होमपेज › National › भारत - चिनी सैन्यादरम्यान आज कमंडर स्तरावरील चर्चा

भारत - चिनी सैन्यादरम्यान आज कमंडर स्तरावरील चर्चा

Last Updated: Aug 02 2020 10:59AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 
सीमेवरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने आज ( दि. २ ) चीनच्या ताब्यातील मोल्डो येथे भारत आणि चीन सैन्यादरम्यान कमांडर स्तरावरील बैठक होणार आहे. याबाबतची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. 

भारतीय लष्कराच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'चीनच्या ताब्यात असेल्या मोल्डो भागात भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये कमंडार स्तरावरील बैठक होणार आहे. या बैठकीला आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुरुवात होईल. या दरम्यान भारत फिंगर पॉईंटवरून चिनी सैन्याने पूर्णपणे माघार घ्यावी याच्यावर भर देणार आहे.'

भारताने गुरुवारी पूर्व लडाखच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर सैन्य माघारीत काही प्रगती झाली आहे पण, माघार घेण्याचे काम पूर्णपणे झालेले नाही असे सांगितले. तसेच चीन वादग्रस्त भागातून प्रामाणिकपणे माघार घेईल आणि सीमेवर लवकरात लवकर पूर्ण शांतता प्रस्थापित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी 'दोन्ही देशांदरम्यान ताणावाचे वातावरण निवळण्यासाठी आणि भारत - चीन सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी  १७ वी बैठक गेल्या आठवड्यात झाली होती.' असे सांगितले. 

मे महिन्यात लडाखच्या पूर्व भागात भारत आणि चिनीचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यानंतर १५ जूनला गलवान खोऱ्यात हिंसक झडप झाल्यानंतर वातावरण अधिक चिघळले होते. हे वातावरण पूर्ववत करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत अनेक सैन्य आणि राजनैतिक स्तरावरील बैठकांच्या फेऱ्या पार पडल्या आहेत.